उस्मानाबाद : शुक्रवार दि. 28 सप्टेंबर रोजी औषधी दुकानदारांच्या देशव्यापी संपात उस्मानाबाद जिल्ह्यातील औषधी दुकानदारांची सहभागी होणार आहेत. या कालावधीत रुग्णांची गैरसोय होऊ नये व औषधांचा पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून अन्न व औषध प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. 

या कालावधीमध्ये औषधी दुकानदार यांनी या संपात सहभागी होऊ नये असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले सरकारी निमसरकारी व खाजगी दवाखान्याने रुग्णांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने मुबलक औषधीसाठा ठेवण्याबाबतच्या सूचनाही देण्यात आले आहेत. उस्मानाबाद जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने सदरच्या बंद काळामध्ये रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून तालुकानिहाय  खालील औषध दुकानांची नावे प्रशासनास कळवली आहे.  उस्मानाबाद तालुका  राजू मेडिकल, मे.केदार मेडिकल,  कळंब तालुका मेडिकल -मे. न्यू गंभीरे मेडिकल, तुळजापूर तालुका मेडिकल,मे.भवानी मेडिकल, परंडा तालुका मेडिकल, मे.सीना मेडिकल,  लोहारा तालुका  मेडिकल मे.गजानन मेडिकल, -वाशी तालुका मेडिकल मे. महाराज मेडिकल, उमरगा तालुका मेडिकल मे. प्रेमनाथ मेडिकल, मे.विजय मेडीको, भूम तालुका मेडिकल-मे. साई मेडिकल.

 सदर बंद काळात औषधाचा पुरवठा करण्यास औषध दुकानदारांनी नकार दिल्यास त्याबाबत सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांचे दुरध्वनी क्रमांक 02472-222606 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा असे अवाहन सहाय्यक आयुक्त (औषधे) अन्न व औषध प्रशासन उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
 
Top