तुळजापुर (कुमार नाईकवाडी) :-

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात दि. ९ रविवार रोजी पारंपारिक पद्धतीने भक्तीमय वातावरणात  बैल पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला.

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मातेचे मुख्य महंत वाकोजी बुवा संस्थान व  महंत हमरोजी बुवा संस्थानचे व छञपती शाहु महाराज संस्थान पंरपंरेने, चालत आलेल्या रुढी पंरपरेने नुसार तत्कालीन  निजाम कालीन सरकारने या संस्थानला श्री तुळजाभवानी मातेची सेवा करण्यासाठी हजारो एकर जमीन कसण्यासाठी दिल्याने याच जमिनी मधुन उत्पन्न काढुन श्री आई तुळजाभवानी मातेच्या दरबारातील सर्व सेवा केल्या जातात. म्हणूनच बैल पोळ्याच्या शुभ मुहुर्तावर श्री तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात साक्षात सर्जा, राजाच्या  बैलाच्या जोड्यांना  बैल पोळ्या दिनी भवानी मातेच्या दरबारात वाजत गाजत आणण्यात आले. नंतर श्री तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात मुख्य महंत श्री तुकोजी बुवा, चिलोजी बुवा, वाकोजी बुवा, श्री  हमरोजी बुवा यांच्या हस्ते  सर्जा,राजा बैलाच्या जोड्यांची  यथा सांग पुजा करुन महाआरती करण्यात आली. घुग-याचा नैवेद्य भरविण्यात आला. 


जिल्ह्यातील व तालुक्यातील बळी राजाच्या शेतकऱ्यांवर कृपा दृष्टी राहावी भरपुर प्रमाणात पाऊस पडावा, बळी राजाची शेती चांगल्याप्रकारे पिकू दे, असे साकडे श्री मुख्य महंतानी श्री तुळजाभवानी चरणी घातले. या वेळी श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान चे धार्मीक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी, विश्वास परमेश्वर आदीसह पुजारी बांधव या बैल पोळ्याच्या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
 
Top