उस्मानाबाद :

 शहरातील छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी क्रीडाई उस्मानाबाद तर्फे दिशादर्शक फलक बसविण्यात आले असून रविवार  दि. 16 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर व ट्राफिक पोलीस शाखेचे पोलिस निरीक्षक चव्हाण यांच्या हस्ते दिशादर्शकाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी डॉ. अभय शहापूरकर, इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे इंजिनीयर असोसिएशनचे अध्यक्ष श्री नाडे, लघु भारतीचे अध्यक्ष  रमेश जी सारडा, रोटरी क्लबचे अध्यक्ष अभिजित पवार पत्रकार संघटनेचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, एकता फाउंडेशन पदाधिकारी वकील व फारमा  सिस्ट  असोसिएशनचे पदाधिकारी आदीची उपस्थिती होती.

क्रिडाई उस्मानाबाद चे अध्यक्ष आशिष पवार यांनी उस्मानाबाद शहरा मध्ये 30 दिशादर्शक फलक बसवण्याचा मानस व्यक्त केला व सर्व संघटनांना यासाठी आपले योगदान देण्याचे आव्हान केले. क्रिडाई उस्मानाबादचे उपाध्यक्ष प्रदिप मुंडे यांनी प्रस्ताविक केले, क्रिडाई उस्मानाबादचे सचिव यांनी राहुल माकोडे यांनी स्वागत केले क्रिडाई उस्मानाबादचे कोषाध्यक्ष रणजीत रणदिवे यांनी तर सूत्रसंचालन केले.

यावेळी उल्हास गपाट, संजय देशमाने, मोहन कुलकर्णी, रोहित निंबाळकर, सचिन शिंदे, शेखर घोडके, सुरज कदम, आनंद पाटील, राहुल गवळी, धीरज मोटे, आदींनी योगदान दिले.
 
Top