तुळजापुर (कुमार नाईकवाडी) :-

पेट्रोल आणि डिझेल चे भाव आकाशाला भिडलेत आणि त्या मुळे सामान्य माणसांच आयुष्य होरपाळून निघतय. इंधनचे  दर हे जागतिक बाजार पेठेशी संलग्न असले तरी त्यावर केंद्र आणि राज्यांनी अव्वाच्या सव्वा पध्दतीने कर लादले आहेत. केद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयाची सर्व सामान्य नागरीकांना नाहक ञास होत असल्याने इधंनच्या वाढत्या दराचे परीणामाच्या विरोधात सोमवार दि. १० सोमवार रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ, सांगवी या पेट्रोल पंपावर जाऊन पंप बंद ठेवण्यास सांगितले. तसेच यावेळी सर्व मनसेच्या कार्यकर्ते  पंपावर ठिय्या मांडून बसले होते. 

यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव,  मनसे तालुका उपाध्यक्ष शशिकांत तांबे, धनाजी साठे, आमोल मोठे, मयुर गाढवे, विद्यार्थी सेना तालुकाअध्यक्ष रोहित दळवी,उपाध्यक्ष सागर जगताप,आकाश पवार ,विभाग अध्यक्ष झुंबर काळदाते, अक्षय साळवे, खंडू कुंभार,शहर उपाघ्यक्ष राहुल गायकवाड,रूषी माने, उमेश कांबळे, सुनिल पवार, प्रशांत डोलारे, राम पवार, गणेश धावारे, सुरज साळवे, महादेव कोरे, श्रीकांत सलगरे आदि मनसैनिक‍ उपस्थित होते.
 
Top