तुळजापुर (कुमार नाईकवाडी) :-
येथील सैनिकी विद्यालय येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय 17 वर्ष वयोगटातील सॉफ्टबॉल स्पर्धेत आरळी बु प्रशाला प्रथम आली असून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे ,तर 14 वर्ष वयोगटाने द्वितीय क्रमांक मिळवून आपले क्रीडा कौशल्य सिद्ध केले आहे.
तुळजापूर तालुकास्तरीय बालसाहित्य स्पर्धेत विविध प्रकारात आपला सहभाग नोंदवत आरळी बू प्रशालेने घवघवीत यश संपादन केले. सतत आपल्या सांस्कूतिक व क्रीडाविश्वात आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न ही प्रशाला करत असते.
पोवाडा या गायन प्रकारात संभाजी भोसले प्रथम तर कथाकथन या प्रकारात कु प्रणाली फूलचंद पौळ ही द्वितीय आली. काव्यवाचन या प्रकारात अंकित अंकुश घोडके प्रथम तर सानिया मुस्तफा सैय्यद तृतीय तर लहान गटात भक्ति महेश व्हरकट तृतीय आली,.
प्रशालेच्या वतीने या यशस्वी विद्यार्थी यांचे स्वागत करण्यात आले,यावेळी मुख्याध्यापक ओहोळ बी एस, विशाल सुर्यवंशी,सोनावणे डी डी ,क्रीडा शिक्षक विष्णू दळवी ,अटपलवार के एन, चंद्रकांत उलेकर, चव्हाण एन के, माने जी व्ही, मोकाशे एन व्ही,साखरे एन आर ,कोरे बी एस, सारणे डी एल, आदि शिक्षक यांनी त्याना मार्गदर्शन केले.
शालेय समिति अध्यक्ष सुनील पारवे ,उपाध्यक्ष डॉ व्यंकट पाटील ,सरपंच सौ ज्योतिताई सुनील पारवे,गांव तन्टामुक्त समिति अध्यक्ष किरण व्हरकट ,धैर्यशील नारायणकर ,अनिल आगलावे ,आदिनी अभिनदंन केले.