नळदुर्ग (सचिन गायकवाड) :-
मानव धर्माचे प्रणेते सद्गुरुदेव श्रीसतपालजी महाराज यांच्या प्रेरणेने व परमश्रद्धेने विभुजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन एज्युकेशन शिक्षा अभियानाच्या माध्यमातून गरीब व गरजु शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. मानव उत्यान सेवा समिती पंढरपूर आश्रम नळदुर्ग शाखेच्या वतीने जि.प.नळदुर्ग प्रशालेत आश्रमाचे संत प्रबंधक महात्मा धान्नबाईजी यांच्या हस्ते गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय वह्या, स्टेशनरी साहीत्य वाटप करण्यात आले.
सतपाल जी महाराज यांच्या प्रेरणेने संपूर्ण देशात तसेच प्रत्येक राज्यात मानव उत्यान योग समिती व मिशन एज्युकेशन शिक्षा अभियान माध्यमातून शालेय साहित्य व अध्यात्मिक प्रचार तसेच सामाजिक कार्य करण्यात येते. मुख्याध्यापक जी. एस राठोड, शैलजा खंङळकर , शिवाजी माने अनिल सागवे , पार्वती सागवे कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महादेव सागवे, कविता संबारी , महादेव चिप्पा , अंबादास तवरम , यांचे कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान लाभले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता पुदाले यांनी केले तर आभार संजय माने