नळदुर्ग (सचिन गायकवाड) :-  

 पनवेल-नवी मुंबई येथील सोनिया महिला मंडळाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय 'पृथ्वी माझी मी तिचा पाईक अॅवार्ड' हा समाजरत्न पुरस्कार तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा येथील पत्रकार तथा सहशिक्षक भैरवनाथ कानडे यांना नुकताच प्रदान करण्यात आला .

      भैरवनाथ कानडे यांच्या शैक्षणिक व सामाजिक आणि सुत्रसंचालन या कार्याची दखल घेवून पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री निशीगंधा वाड यांच्या हस्ते व कवयित्री अनघा तांबोळी, उपमहापौर चारुशिला घरत, लावणी सम्राज्ञी प्रियांका शेट्टी, विजय जोशी, अंजली इनामदार, मिसेस माईलस्टोन अनिता राठोड, सोनिया महिला मंडळाच्या अध्यक्षा सुहासिनी केकाने, विश्वनायक लोकसंसदचे सुरेश यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत कानडे यांना सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबददल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
 
Top