नळदुर्ग (सचिन गायकवाड) :
पेट्रोल,डिझेल व गॅस सिलेंडर यांचे दर गगनाला भिडलेत आणि सामान्य माणसांचे आयुष्य होरपळून निघत आहे.यासह शेतकर्यांच्या विविध अडचणी या विरोधात सरकार च्या निषेधार्थ आज जळकोट ता.तुळजापूर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.
या बंदमध्ये तमाम व्यापारी,वाहनधारक,शेतकरी व नागरीक मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्स्फूर्तपणे भाग घेतला.
हा बंद यशस्वी करण्यासाठी काँग्रेसचे नेते अशोक भाऊ पाटील,जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण(काँग्रेस), मनसेचे जिल्हाध्याश प्रशांत नवगिरे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष महेश कदम,ग्रा. पं.सदस्य प्रा.गजेंद्र कदम,शंकर वाडीकर,जितू कदम,मनविसे उपजिल्हाध्यक्ष मल्लिकार्जून कुंभार,माजी पं.स.सदस्य मल्हारी लोखंडे,मनसे शहराध्यक्ष गिरीष नवगिरे,गुणवंत पाटील,शिवराज स्वामी,शकिल मुलाणी,बसवराज कवठे,अंगद पाटील,भरत पाटील,भैय्या किलजे,रोहित पाटील,राहूल पाटील,यशवंत सुरवसे,सतिश पट्टेवाले,बालाजी सुरवसे,गणेश सावंत,अनिल भोगे,सिध्दार्थ लोखंडे यांच्यासह नागरिकांनी परिश्रम घेतले.
यावेळी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले,मंडळ निरीक्षक दूधभाते यांना निवेदन देण्यात आले.