अणदूर (सचिन तोग्गी) :-
तुळजापुर तालुक्यातील अणदुर शहरात युवानेते सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. देशात पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसचे झपाट्याने होणारी दरवाढ व शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या आदि प्रश्नाने जनतेचे दैनंदिन अनेक अडचणी. व तसेच रूपयांचा मूल्यामध्ये सतत होणारी घसरण व राफेल खरेदी करार अशा अनेक महत्त्वाच्या मुद्दासह या झोपेचे सोंग घेतलेल्या भाजपा सरकारला जागे करण्यासाठी,अणदूर मध्ये आण्णा चौक येथुन चिवरी पाटी ते एस. टी.स्टँड ते आण्णा चौक येथे निषेध फेरीची सांगता करण्यात आली.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सुनिल चव्हाण, धनराज मुळे, सुरेश लंगडे, बालाजी घुगे, मलंग शेख, सिद्राम शेटे, कल्याण कुताडे, आप्पासाहेब शेटे, संगाप्पा हागलगुंडे, ज्ञानेश्वर घुगे, उमाकांत आलूरे, सुदर्शन मोकाशे, आनंदराजे पाटील,उमेश गायकवाड यासह सरपंच व उपसरपंच ग्राम पंचायत सदस्य, व वि.वि. कार्यकारी सो. चे. चेअरमन, व्हाईस.चेरमन, संचालक, आय काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, विविध सेलचे नेते, शेकडो संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.. तसेच अणदुर मधील समस्त व्यापारी संघटनेनी अणदुर बंद ला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वाचे आभार काँग्रेस कमिटीने मानले.