सांगली (राजेश पाटील) :

वायफळे (ता. तासगाव, जि. सांगली) येथील राजेश फाळके यांच्या हत्याकांडाची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे समाज कल्याण राज्यमंत्री ना  दिलीप कांबळे यानी केली. 

वायफळे ता तासगांव येथे अनुसूचित जातीचे मातंग समजातील राजेश फाळके यांना मारहाण केली होती त्यात फाळके यांचा मृत्यू झाला . या पिढीत कुटुंबाला राज्याचे  समाज कल्याण राज्यमंत्री ना. दिलीप कांबळे यांनी भेट दिली. याप्रसंगी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य तथा आरपीआयचे कार्याध्यक्ष संदेश भंडारे, मातंग महासंघाचे अध्यक्ष दलितमित्र अशोक पवार, प्रांताधिकारी डॉ विकास खरात, तहसीलदार दीपक वजाळे, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त सचिन कवले आदि प्रमुख उपस्थित होते.  

यावेळी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार  पिढीत फाळके कुटूंबाला ४ लाख १२ हजाराचा धनादेश मदत म्हणून राज्य शासन व जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या वतीने सुपूर्त करण्यात आला. 

यावेळी मंत्री ना कांबळे पुढे म्हणाले, पिढीत कुटूंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत घेता येईल, व दुसऱ्या सुद्धा अनुकंपातुन वडिलांच्या जागेवर नोकरी शक्य आहे. शासन जेवढी मदत करेल तेवढी कमीच आहे या मदतीने दुख भरून येणे शक्य नाही परंतु पिढीत कुटुंबाचे पुनर्वसन करणे हे आमचे कर्तव्य आहे असे ते म्हणाले.

यावेळी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य संदेश भंडारे यांनी या संपूर्ण घटनेची माहीती मंत्री ना कांबळे साहेब यांना दिली. या खटल्याची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात घ्यावी अशी मागणी करत आरोपीना फाशी झाली पाहिजे असे मत व्यक्त केले. 

यावेळी मातंग समाज संघटना अध्यक्ष दलितमित्र अशोक पवार, प्रदीप फाळके,प्रा राम कांबळे, पोलिस निरीक्षक अजय सिंदकर, फाळके गुरुजी, प्रकाश फाळके, प्रमोद फाळके,अमित सावंत, प्रमोद लोखंडे, अमित कांबळे,बिटु फाळके, संतोष हंकारे यांच्या सह जिल्ह्यातील मागासवर्गीय संघटनांचे पदाधिकारी व  वायफळे येथील ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलिस बंदोबस्त मोठ्याप्रमाणावर लावण्यात आला होता.   

 
Top