![]() |
सौ. मंगलताई पंजाबराव राऊत |
बीड (गणेश गिराम) :-
जिल्हयातील चौसाळा येथील प्रसिद्ध जयहिंद गणेश मंडळाची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली असुन या वर्षी मंडळाची पुर्ण धुरा महिलाच्या हाती देण्यात आली आहे. अध्यक्षपदी सौ. मंगलताई पंजाबराव राऊत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. चौसाळा परीसरातील नावलैकीक मिळवून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणा-या या प्रसिद्ध गणेश मंडळाने या वर्षी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.
या उपक्रमात प्रामुख्याने किर्तन महोत्सव हा केंद्र बिंदु आहे. या किर्तन महोत्सवात ह.भ.प. नामदेव बापु महाराज कवडे ,ह.भ.प. दत्ताञय महाराज आंभीरकर,ह.भ.प.संजवनी ताई हाळदे,ह.भ.प.भास्कर बुवाजी महाराज नाशिककर ,ह.भ.प.आण्णासाहेब महाराज बोधले,ह.भ.प. पारस महाराज मुथ्था,ह.भ.प.सोनाली ताई करपे यांची किर्तन सेवा होणार आहे.ह.भ.प.बिरजु भैया महाराज यांचा भारूडाचा कार्यक्रम होणार आहे.त्यांच बरोबर भव्य रक्तदान शिबीर ,फॅन्सी ड्रेस स्पर्धा ,रांगोळी स्पर्धी ,चिञकला स्पर्धा,सुदृढ बालक स्पर्धा, कृषी मार्गदशन शिबीर सेंद्रीय शेती ,आरोग्य तपासणी शिबीर रक्तदाब व शुगर तपासणी ईत्यादी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. भव्य शोभा याञा टाळ मृदंगाच्या गजरात श्रींची भव्य विसर्जन मिरवणुक काढण्यात येणार आहे.
![]() |
सौ. सुरेखाताई पोपट कळसकर |
तसेच उपाध्यक्ष पदी सौ. सविताताई सचिन चौधरे, सौ. राधाताई नितीन कळसकर, सौ. राणीताई राजेश निनाळे व सचिव पदी सौ. सुरेखाताई पोपट कळसकर तसेच या वर्षी जयहिंद गल्लीतील सर्व महिला यांना मंडळातील सर्व कामाच्या समित्या तयार करून जबाबदारी देण्यात आली आहे. या बैठकीस सर्व महीला व आजी माजी मंडळाचे सर्व सभासद उपस्थीत होते.
तरी चौसाळा व परीसरातील सर्व भाविक भक्तानी सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्याव, असे अवाहन समस्त जयहींद गणेश मंडळ यांनी केले आहे.