तुळजापुर (कुमार नाईकवाडी) :-
शहरातील श्री गणेश मंडळाच्या पदाधिका-यांनी श्री गणेश उत्सवाच्या दरम्यान वर्गणीची सक्ती करु नये, श्री गणेशासमोर टाईमपासच्या नावाखाली जुगार खेळु नये, श्री गणेश उत्सव शांतेत पार पाडावा असे आवाहन तुळजापुर उपविभागीय कार्यालयाचे पोलीस अधिक्षक माधव प्रधान यांनी केले.
तुळजापुर पोलीस ठाणे येथील कार्यालयात सोमवार दि. १० सप्टेंबर रोजी गणेश उत्सव व मोहरम सणानिमित्त शांतता कमिटी बैठक संपन्न झाली. यावेळी प्रधान हे बोलत होते. याप्रसंगी तुळजापुर पोलीस ठाण्याचे उपपोलीस निरीक्षक योगेश खटाणे, गोपाळ सुर्यवंशी, म.रा.विद्युत मंडळाचे साहाय्यक अभियंता महेश सिंग, न.प.कार्यालयाचे कार्यकारी अभियंता नितीन इजाते यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना सहाय्यक पोलीस अधिक्षक माधव प्रधान म्हणाले की, शहरातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेश उत्सव व मुस्लिम बांधवानी मोहरम सण शांततेत पार पाडावा, शहरातील गणेश मंडळाच्या पदाधिकारी यांनी म.रा.वि.महामंडळाकडुन रितसर परवानगी घेऊनच विद्युत लाईट वापरावी, आकडा टाकुन विद्युत लाईट घेऊ नये तसेच शहरातील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन मिरवणूकीच्या दरम्यान डी.जे. डाँल्बी वाजवु नये, गणेश उत्सवा दरम्यान कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू देवु नये, शहरातील गणेश मंडळानी गणेश उत्सव शांतेत पार पाडावा, असे आवाहन प्रधान यांनी केले.
या बैठकीस शहरातील गणेश मंडळाची पदाधिकारी व तालुक्यातील गणेश मंडळाचे पदाधिकारी, पोलीस पाटील उपस्थित होते.