इंदापूर : अमोल राजपूत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वालचंदनगर (ता. इंदापूर) शहराध्यक्षपदी प्रशांत पवार यांची निवड करण्यात आली.
इंदापूर येथे प्रशांत पवार यांना निवडीचे पत्र पुणे जिल्हा मनसे उपाध्यक्ष राजेंद्र हजारे, यांच्या हस्ते देण्यात आले. पुणे जिल्हा सचिव मनसे राजभाऊ काळे, इंदापूर तालुक्याचे मनसे अध्यक्ष संतोष भिसे या वेळी उपस्थित होते. पवार यांना वालचंदनगर शहराध्यक्ष मिळाल्याबद्दल त्याचे संपूर्ण पुणे जिल्हा व इंदापूर तालुकास्तर कौतुक होत आहे.
