इंदापूर : अमोल राजपूत
मनुष्य हा त्याच्या जन्माने नाही तर त्याच्या कर्माने मोठा होतो हे अनेकदा सिध्द झाले आहे.आपल्या परिस्थितीबद्दल रडत न बसता सकारात्मक विचारसरनी ठेऊन जिद्द व मेहनतीच्या जोरावर यश प्राप्त करता येते असा आशावाद पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने यांनी व्यक्त केला.
इंदापूर तालुक्यातील कळंब गावचा सुपुत्र रोहीत चव्हाण याने दक्षिण कोरीया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय भाला फेक स्पर्धेमध्ये ६३ देशातील स्पर्धकांना मागे टाकुन सुवर्णपदक प्राप्त करुन दैदिप्यमान कामगीरी करुन कळंब गावचे नावं उज्वल केल्याबद्दल इंदापुर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठाण संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाच्या वतीने सुवर्णपदक विजेता रोहित चव्हाण याचा भव्य सत्कार सभापती प्रविण माने यांचे हस्ते करण्यात आला.रोहित चव्हाण हा विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्यावेळी अध्यक्षिय भाषणात ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की रोहित चव्हाण याच्या घरची परिस्थिती हलाकिची होतो वडील गवंडी काम करत असताना त्यांच्या हाताखाली बिगारी काम करुन रोहीत शिक्षण घेतले.खेळाविषयी जिद्द व मेहनत करुन आई व वडीलांच्या कष्टाची जाणीव ठेवुन सुवर्णपदक मिळवुन आपल्या गावाचे , देशाचे,आई वडीलांचे व शिक्षकांचे नाव सातासमुद्रापार नेले हि बाब नविन युवक युवतींसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रविण माने म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेते व महाविद्यालयाचे सचिव विरसिंह रणसिंग यांनी केले.ते म्हणाले की ग्रामिण भागातील गोरगरीब होतकरु मुला मुलींना उच्च शिक्षण घेता यावे जागतीक स्पर्धेमध्ये ग्रामिण युवक टिकला पाहीजे या दृष्टीने ज्येष्ठ नेते स्वर्गीय विश्वासराव रणसिंग यांनी शैक्षणिक रोपट लावलं अनेक गुणवंत विद्यार्थी व हितचिंतकांच्या एकत्रित प्रयत्नातुन या ठिकाणी वटवृक्ष झाला आहे.या छायाछत्राखाली अनेक युवक युवती शिक्षण प्राप्त करुन देशाची समाजाची सेवा करत आहेत व भविष्यकाळामध्ये अशी युवा पिढी तयार करण्याचा वसा इंदापुर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठाण ने घेतला असल्याचे रणसिंग म्हणाले.
सदर कार्यक्रमास प्राचार्य अंकुशराव आहेर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष योगेश डोंबाळे, कार्यालय अधिक्षक शिवाजी कदम,प्रा.हमिद काझी यांचेसह अनेक मान्यवर,ग्रामस्थ व महाविद्यालयीन युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रा.प्रशांत शिंदे यांनी केले.
