मुरूम :

प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी उमरगा तालुक्यातील मुरुम येथील शिवप्रेमी प्रतिष्ठान व नवशक्ती गणेश मंडळाच्या वतीने आरोग्य शिबीर,नेत्र तपासणी शिबीर,रक्तदान शिबीर,वृक्षारोपण आदी उपक्रम राबवत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात आहे. शनिवारी (दि 21) वृक्षारोपण कार्यक्रम पार पडले.

  येथील सुभाष चौकातील नवशक्ती गणेश मंडळ व शिवप्रेमी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार (दि 21) रोजी हिंदू समशान भूमी तसेच जुना कुरुडगी नाका येथे वृक्षारोपण करण्यात आले.शिवप्रेमी चे अध्यक्ष नगरसेवक अजित चौधरी यांच्या पुढाकारातून करण्यात आलेल्या या वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी रोपांच्या संवर्धनासाठी लोखंडी जाळ्याही बसवण्यात आल्या.या प्रसंगी भाजपा चे उद्योग आघाडी सदस्य राजू मिनीयार,डॉ नितीन डागा,गुलाब डोंगरे,मराठा सेवा संघाचे संजय सावंत,गणेश मंडळाचे अध्यक्ष सागर बिराजदार,उपाध्यक्ष प्रमोद आळंगे,सचिव विशाल मोहिते सह जयसिंग खंडागळे,विशाल टेकाळे,ओमकार चौधरी,सागर खंडागळे, राजेंद्र चौधरी,रवी देसाटे,पंकज बिराजदार आदी उपस्थित होते.

 
Top