नळदुर्ग :
गणेशोत्सव व मोहरम सण हिंदु-मुस्लिम बांधवांनी नळदुर्गमध्ये शांततेत व उत्साहात साजरा केला. यावेळी पोलीस प्रशासनाने आवाहन केल्यानुसार विविध मंडळांचे कार्यकर्त्यांनी कायदयाचे पालन करुन दोन्ही उत्सव साजरे केले असून या कालावधीत पोलीस प्रशासनाने कुठेही अनुचित प्रकार घडू नये, याकरीता चोख पोलीस बंदोबस्त ठेवल्याबद्दल नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचा-यांचा सामाजिक कार्यकर्ते फारुख कुरेशी व शिवाजी गायकवाड़ यांच्यावतीने भव्य सत्कार करण्यात आला.
नळदुर्ग शहरातील हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्रितपणे शांततेने गणेशोत्सव व मोहरम सण साजरा केला. या उत्सवात पोलिस प्रशासनावर प्रचंड ताण होता. पोलीस बंदोबस्त करताना पोलिसांची दमछाक होताना दिसत होती. या सर्व काळत पोलीसांनी त्यांच्या परीने बंदोबस्त लावुन कर्तव्य बजावले. त्यामुळे नळदुर्गकरांच्या वतीने सहाय्क यपोलीस निरीक्षक मिरकले साहेब, पोलीस उपनिरीक्षक अनिल खोडेवाड, डी.डी. राडकर, विठ्ठल वारे यांच्यासह सर्व पोलीस कर्मचा-यांचे पुष्पहार, शाल ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
यावेळी पोलीस पाटील सूर्यकांत पाटील, शिवाजीराव मोरे, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक शहबाज काजी, माजी नगरसेवक कमलाकर काका चव्हाण, नगर सेवक नितीन कासार, विनायक आहंकारी, महालिंग स्वामी, माजी नगरसेवक सचिन डुकरे, शब्बीर कुरेशी, शिवसेना शहराध्यक्ष संतोष पुदाले, मनसेचे जोतीबा येडगे, गौस शेख, पिंटु पुदाले, सुभाष गायकवाड़, नागऩाथ पारधे, नळदुर्ग बसस्थानकाचे वाहतुक नियंत्रक दिपक डुकरे, धनराज गायकवाड़, नारायण हजारे आदीजण उपस्थित होते.
