तुळजापुर (कुमार नाईकवाडी) :

छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे मनाला खंत वाटली, गेल्या काही दिवसापासुन येथील छञपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हालत असल्यामुळे पुतळ्याची डागडुजी करुन सुशोभिकरण करण्याच्या सूचना  संबंधित विभागाला देवून   छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची डागडुजी करण्यासाठी व सुशोभिकरण करण्यासाठी या पुढे छञपती संभाजी महाराज यांच्या स्वतःच्या फंडातुन निधी खर्च करुन सुशोभिकरण करण्यात येईल, असे मत  तुळजापुर येथील धार्मिक मंदीर कार्यालयात  छञपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज खासदार छञपती संभाजी महाराज यांनी पञकार परिषदेत व्यक्त केले.


 खासदार छञपती संभाजी महाराज यांनी मंगळवार दि.२५  रोजी श्री कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची यथा सांग पुजा अभिषेक पुजा करुन मनोभावे दर्शन घेतले. या नंतर धार्मिक कार्यालयात खासदार छञपती संभाजी राजे यांचा जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष डाँ राधाकृष्ण गमे यांनी पुष्पहार देवून श्री देवीची प्रतिमा देवुन सत्कार केला. पञकार संघाच्या वतीने पञकार संघाचे जिल्हाध्यक्ष धनजंय रणदिवे, पञकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत कदम' पञकार ए.टी. पोफळे,तालुका अध्यक्ष संजय खुरुद आदीसह पञकार बांधवानी शाल श्री फळ पुष्पहार घालुन सत्कार केला.

या वेळी उपजिल्हाधिकारी चेतन गिरासे, शिवसेनेचे सुधीर पाटील, जिल्हा परिषद सदस्य अॅड. धिरज पाटील, मंदीर संस्थानचे तहसीलदार राहुल पाटील, धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी,  गुलचंद व्यवहारे विकास मलबा, सत्यवान सुरवसे, छावाचे जीवन राजे इंगळे, महेश  गवळी, कुमार टोले, आण्णासाहेब क्षिरसागर, किशोर पवार आदीसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

 पुढे बोलताना छञपती संभाजी महाराज म्हणाले की, श्री  कुलस्वामिनी आई तुळजा भवानी माता कोट्यावधी जणाचे आराध्य दैवत असल्यामुळे श्री देवीदर्शनार्थ येणाऱ्या देवि भक्तांना लवकरच रेल्वेची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी आपण भरपुर प्रयत्न करणार आहोत. तुळजापुर रेल्वे साठी आपण या बाबत केद्रींय मंञी नितीन गडकरी यांची भेट घेऊन सर्व माहिती पटवून सांगितली आहे. लवकरच रेल्वे प्रश्न मार्गी लावुन निधी कसा प्रकारे आणता येईल याची आपण स्वतः उपाय योजना करुन तुळजापुरला रेल्वे आणण्यासाठी प्रयत्न करणार असे सांगितले. तसेच पासपोर्ट  साठी ही प्रयत्न करणार असल्याचे खा. संभाजीराजेंनी सांगितले.
 
Top