तुळजापूर (कुमार नाईकवाडी) :
शुक्रवार दि. 7 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे तुळजापूर शहर कार्याध्यक्ष, गोदावरी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धनंजय कदम यांचा वाढदिवस उपजिल्हा रूग्णालय तुळजापूर येथे रुग्णांना फळे वाटून व गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करून करण्यात आला.
यावेळी शहराध्यक्ष संदिप गंगणे, तालुका अध्यक्ष आनंद कंदले, उपाध्यक्ष आप्पासाहेब पवार, तालुका उपाध्यक्ष राहूल साठे, संचालक सचिन कदम, तौफीक शेख, दुर्गेश साळुंखे, आरीफ बागवान, विक्रम कदम, मयुर कदम, राजेश्वर कदम, नागेश कदम व कार्यकर्ते उपस्थित होते.