हौसाई बंडू आठवले

सांगली : राजेश पाटील

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मातोश्री हौसाई बंडू आठवले यांचे स्मरणार्थ स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र सावळज गावी उभा करण्याचा मानस सांगली जिल्ह्याचे  खासदार संजय पाटील यांनी श्रद्धांजलीपर कार्यक्रमात बोलून दाखविला होता. दिलेल्या शब्दाशी वचनबद्ध राहून खासदार संजयकाका पाटील यांनी तात्काळ १५ लाख रुपयांचा निधी जाहिर केला.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे सावळज गाव हे आजोळ असल्यामुळे त्यांचे बालपन सावळज या गावी गेले होते.त्यांच्या मातोश्री हौसाबाई आठवले यांनी अतिशय प्रतिकूल व गरिब  परिस्थितीततून मार्ग काढत आठवले साहेबांच्या प्रगतीचा आलेख उंचावत ठेवला.

ह्या महान माऊलीच्या ऋणातून उतराई म्हणून त्यांचे  स्मरणार्थ सावळज गावाने आपले आद्य कर्तव्य समजून चौदावा वित्त आयोगामधून १२ लाख रुपये निधी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी जाहिर केला. अशा प्रकारे एकूण  २७ लाख रुपये रक्कमेची तरतूद स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी करण्यात आलेली आहे.  ह्या मार्गदर्शन केंद्रात ग्रंथालय, लेक्चर हॉल, कॉन्फरन्स हॉल अशी रचना करण्यात येणार आहे.

हा निधी मिळविण्यासाठी सरपंच योगेश पाटील आर.पी.आय चे नेते दिवाकर भिसे, ॲड. मिलिंद धेंडे, सुनिल धेंडे सर, आनंद धेंडे, खासदारांचे स्वीय सहाय्यक खंडू होवाळे, दिलीप देसाई यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे विशेष योगदान लाभले.

 
Top