महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात महान अशी न भुतो न भविष्य क्रांती  करणारे शिक्षण तज्ञ, ढोल  बडवे, गुर्जीचे गुर्जी उर्फ हेड (नसलेले) मास्टर (आमच्या जि.प.च्या साळंतील पोरं त्यांना  'हाड मास्तर' म्हणतात [अपभृशांने बरं का] गुजराती या (भाषा)  मावशीवर जास्त प्रेम करणारे सदगृस्त (सदा [वादाने] गृस्त असे वाचू नये.) असलेल्या इनोद गुर्जीनी एक धाडसी निर्णय घेत नवा ढोल बडवला. तो असा की महाराष्ट्रातील तमाम  गुरूजींना प्रशिक्षण देण्यासाठी वंदे गुजरात या चँनेलची नेमणूक केली. यामुळे आमचे गुरूजी हुशार होतील, तावडे मास्तरा सारखे हुशार होतील, भविष्यात गुजराती व्यापारी, उद्दोजक व राजकारणी इथे आल्यानंतर (बुलेट ट्रेनने सुसाट बरं का) आमच्या मराठी लोकांना कुठलीही भाषेची अडचण येणार नाही. आशा दुरगामी विचार करणाऱ्या इनोद मास्तरांना मोदी शेठनी एखादा भारतरत्न देण्याचा विचार केला असेल हे निश्चित मानत आम्ही फोन लावला असता त्यांनी पुढील उत्तर दिले.

"आठवीच्या पाठ्यपुस्तकात गुजराती धडे दिले आहेतच. माञ त्याआधी गुरूजीनाही गुजराती भाषेच्या चँनेलवरून प्रशिक्षण देणे गरजेचे आहे हे आमच्या ध्यानात उशिरा आले. मागील आठवड्यात  आम्ही  फापडा, ढोकळा खात असताना हे सुचलं आणि आम्ही शिक्षकांनाच वंदे गुजरात करायला लावलं. आता कसं, शिक्षकांना आठवीच काय पहिलीतही गुजराती शिकवणं सोप्प होईल आणि आम्हाला मोदी शहांना खुश करणं... आणि इनोद गुर्जीनी आमच्या जै महाराष्ट्र आधी जै श्रीकृष्ण म्हणत फोन ठेवला...

 ✒ घाटशिळचा वाटाड्या
 
Top