तुळजापुर : कुमार नाईकवाडी 

कोट्यावधी भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता श्री गणरायाचे रविवार दि.२३ सप्टेंबर  रोजी अनंत चतुर्थी दिनी भक्तीमय वातावरणात ढोल ताशाच्या गजरात "गणपती बप्पा मोरया" पुढच्या वर्षी लवकर या" च्या जयघोषात भावपुर्णे निरोप देण्यात आला गेल्या  १० दिवसा पासुन श्री गणराया बप्पा ची श्री गणेश भक्तानी मोठ्या भक्तीमय वातावरणात श्री गणेश उत्सव साजरा केला या मध्ये तुळजापुर शहरातील अनेक तरुण मंडळानी,बालमंडळानी श्री गणेश उत्सावा निम्मीत विविध कार्यक्रम घेऊन महाप्रसाद अन्नदान करण्यात आले येथील जवाहर मंडळ,व रणसम्राट तरुण मंडळ यांनी श्री  गणेशा ची  ढोल ताशाच्या गजरात शहरातुन भव्य दिव्य मिरवणूक काढुन आनंदोत्सव साजरा केला. त्याच बरोबर शहरातील नागरीकांनी श्री गणेशाची यथा सांग पुजा करुन आरती करुन श्री गणेशास भावपुर्ण निरोप देण्यात आला. सायंकाळी भक्तीमय वातावरणात येथील रामधरा तलाव, तिर्थ खुर्द जवळील मोर्डा तलावात तसेच पांचुदा तलावात श्री गणेशा चे विसर्जन करण्यात आले.

तालुक्याचे आमदार मधुकरराव चव्हाण यांनी तुळजापुर शहरातील ठिक ठिकाणी  बसविलेल्या  श्री गणेशा ची महाआरती करवुन आशीर्वाद घेतला. या वेळी नगरसेवक सुनील रोचकरी, रणजीत इंगळे, कुमार वाघमारे, भारत कदम आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top