सोलापूर :- सोलापूर शहरासह मोहोळ व पंढरपूर तालुका मंगळवार दि. 11 सप्टेंबर रोजी गुढ आवाजाने हादरला. या घटनेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. एखादा मोठा स्फोट व्हावा असा आवाज आल्याने चार वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरची वाहतुक थबकली आणि घरातील, कार्यालयातील माणसे बाहेर रस्त्यावर पळत आली. यावेळी आवाज जमिनीतून आला की आकाशातून याचाही नेमका अंदाज बांधता आला नाही इतका तो मोठा होता. 

आवाज आल्यावर काहीनी आकाशाकडे पाहिल्यावर एखादे सुपरसॉनिक विमान गोलाकार वळून गेल्याप्रमणे त्याच्या धुरच्या रेषांचा पट्टा दिसत होता. या आवाजानंतर काही मिनिटात सात रस्ता परिसरात असलेल्या सुधांशू भालेराव या नागरिकाने आकाशाच्या त्या विमानाच्या धुराचा काढलेला हा फोटो काही वेळात सोलापूरात व्हायरल झाला.

 या आवाजाने फारशी हानी झाली नाही मात्र आवाज नेमका कशाचा याची माहिती घेण्यासाठी लोक घराबाहेर येऊन परस्परांमध्ये चर्चा व चौकशी करीत होते़.
 
Top