तुळजापुर (कुमार नाईकवाडी) :

तुळजापुर गटशिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पंचायत समिती सभागृहात पार पडला.

यावेळी माजी मंत्री आ. मधुकरराव चव्हाण, जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, पं.स.सभापती शिवाजी गायकवाड़, जि.प. सदस्या अस्मिता कांबळे, प्रकाश चव्हाण, पं.स.सदस्य चित्तरंजन सरडे, गटविकास अधिकारी धवळशंख, प्रभारी गटशिक्षण अधिकारी धुरगुडे, तालुका विस्तार अधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना आ. मधुकरराव चव्हाण म्हणाले की, शिक्षक हा ग्रामीण व्यस्थेचा कणा आहे भावी पिढी धडविन्याचे काम करतो,आज पुरस्कारप्राप्त शिक्षक यांची जबाबदारी वाढली आहे त्यांनी आपले कर्तव्य करीत समाज व्यवस्था सुधारण्यासाठी काम करावे, आपली शाळा गुणवत्ता प्रधान बनवुन आदर्श विद्यार्थी घड़वावा, असे आ. चव्हाण यांनी सांगितले.

 यावेळी सर्व सन्माननिय पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा मान्यवारांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये श्रीम. गोरे रेखा अरविंद (जि. प. प्रा. शाळा सांगवी मार्डी),खडके अशोक चंद्रकांत (जि. प. प्रा. शाळा खोताचीवाडी), सुर्यवंशी विष्णू रामाभाऊ (जि. प. प्रा. शाळा मोर्डा),शिंदे मोहन सोपानराव (जि. प. प्रा. शाळा किलज),श्रीम.क्षिरसागर श्रध्दा गुणवंत (जि. प. प्रा. शाळा सं.नगर जळकोट),श्रीम. राऊत सुरेखा नवनाथ (जि. प. प्रा. शाळा हंगरगा नळ),श्रीम. वाघमारे वंदना लिंबाची (जि. प. प्रा. शाळा वसंतनगर नळदूर्ग ),कोळी हरिश्चंद्र रामचंद्र (जि. प. प्रा. शाळा निलेगांव),श्रीम. मुल्ला आशाबी आमिनसाहेब (जि. प. प्रा. शाळा चव्हाणवाडी अणदूर),श्रीम. स्वामी रुपाली राजेंद्र (जि. प. प्रा. शाळा कोरेवस्ती केशेगाव), सुर्यवंशी विशाल अंगद (जि. प. प्रशाला आरळी बु.),धर्मे काशीनाथ नागनाथ (जि. प. प्रा. शाळा कसई), संगमनेरकर सतिश महादेव (जि प. कन्या प्रा. शाळा काटी),तोटावाड व्यंकट नारायण (जि. प. प्रा. शाळा गोंधळवाडी), जमादार कैलास विठ्ठलराव (जि. प. प्रशाला मंगरूळ),श्रीम. दखनी शमशादबेगम अखलाख (जि. प. उर्दू प्रा. शाळा नळदूर्ग ),मगतराव विक्रम दिगंबराव (जि. प. प्रा. शाळा वागदरी) यांना सन्मान चिन्ह ,सन्मानपत्र ,शाल, श्रीफल देऊन सपत्नीक तालुका पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी निवृत्त गटशिक्षण अधिकारी कल्याण सोनवणे यांना आ. मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते निवृत्तीबाबत सन्मानित करण्यात आले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभाग कर्मचारी, तसेच शिक्षक संघटना ,शिक्षक यांनी परिश्रम घेतले.
 
Top