तुळजापुर (कुमार नाईकवाडी) :-

येथील जिजामाता नगर येथुन गाडीच्या च ड्रायव्हर ने इंडिका कार लंपास केल्याची घटना घडली.

या बाबत पोलीस सुञा कडुन मिळालेली माहिती अशी की,  दि.५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास  तुळजापुर येथील जिजामाता नगर येथे राहणाऱ्या सौ प्रभा प्रमोद मार्डीकर ह्या गुलबर्गा येथुन आपल्या घरी आल्या असता दारासमोर लावलेली इंडिका कार क्रं.M.H.13 .A.x.1345 जुनी वापराची  त्यांच्या च गाडीचा  ड्रायव्हर आरोपी शैलेद्रं विजय कुमार देव रा.कोट गल्ली उस्मानाबाद यांनी कार व गाडीत ठेवलेले ५० हजार रुपये रोख रक्कम  व मुळ कागद पञासह गाडी चोरुन नेली.प्रभा मार्डीकर यांच्या फिर्दीवरुन तुळजापुर पोलीस ठाण्यात आरोपी शैलेश देव यांच्या विरोधात गु.र.279/18 कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पो.का दिलीप राठोड करीत आहे.
 
Top