लोहारा (इकबाल मुल्ला) :-
उस्मानाबाद जि.प.आरोग्य विभाग व पं.स. लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने लोहारा शहरातील ग्रामीण रुग्णालयात दि.7 सप्टेंबर रोजी लोहारा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी दिव्यांग व्यक्तीची तपासणी व प्रमाणपत्र वाटप शिबीर घेण्यात आले.
या शिबीराचे उदघाटन जि.प.अध्यक्ष नेताजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख म्हणुन समाज कल्याण सभापती चंद्रकला नारायणकर, जिल्हा आरोग्य अधिकारी एच.व्ही.वडगावे,पं.स. सभापती ज्योतीताई पत्रिके,जि.प.सदस्या शितल पाटील,माजी जि.प.सदस्य दिपक जवळगे,ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.आर.यु.सुर्यवंशी, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे,सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ.जास्मिन शेख,तालुका वैद्यकीय अधिकारी एम.डी.पाटील,शामसुंदर तोरकडे, अँड.विश्वनाथ पत्रिके,गटशिक्षणाधिकारी तबसुम सय्यदा,शंकर पाटील,डॉ.गोविंद साठे,अदि उपस्थित होते.
यावेळी जि.प.अध्यक्ष नेताजी पाटील,जिल्हा आरोग्य अधिकारी एच.व्ही.वडगावे,पं.स.सभापती ज्योती पत्रिके यांनी मार्गदर्शन केले.या शिबीरात अंगणवाडीतील दिव्यांग बालक,तालुक्यातील शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनीची तपासणी करण्यात आली.या शिबिरात मनोविकार 43, डोळे 27,कान,
नाक,घसा 7, अस्थीव्यंग 54 असे एकूण 131 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.या रुग्णाची तपासणी अस्थिरोग तज्ञ डॉ.विक्रम आळंगेकर,डोळे तज्ञ डॉ.सुनंदा सुर्यवंशी,मनोरग तज्ञ डॉ.महेश कानाडे,
कान,नाक,घसा तज्ञ डॉ.विजय जाधव,यांनी केली.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सुत्रसंचालन गटशिक्षण कार्यालयाचे विस्तार अधिकारी डी.एम.जंगम यांनी केले तर सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ.जास्मिन शेख यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास पं.स. प्रशासन अधिकारी पी.एम.चौगुले,विष्णु नारायणकर, विस्तार अधिकारी एन.टी.आदटराव,सी.ए.जाधव,
लक्ष्मण शेळके,अनंद सोनकांबळे,अनंद लहाणे,
श्रीमंत काळे,हणमंत दुधभाते,विनोद शिंदे,अर्चना शेटे, यांच्यासह महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.