लोहारा (इकबाल मुल्ला) :-
लोहारा तालुक्यातील अचलेर येथे संत शिरोमनी सेना महाराज यांची पुण्यतिथी विविध उपक्रम घेवुन उत्साहात साजरी करण्यात आली.
संत सेना महाराज यांच्या प्रतिमेची स्थापना दि.6 सप्टेंबर रोजी सांयकाळी सात वाजता श्री.ह.भ. प.रामभाऊ पुजारी महाराज यांच्या हस्ते करण्यात आली.व प्रतिमेचे पुजन गुंडू सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सिद्धाना सुरवसे,अशोक सुरवसे,सुधाकर सुरवसे,गुंडू सुरवसे,मलिनाथ सुरवसे, बसवराज सुरवसे,यांच्यास ग्रामस्थ उपस्थित होते. यानंतर रामभाऊ पुजारी महाराज यांनी संत सेना महाराज यांचे जीवन व कार्य याविषयी प्रवचन व किर्तन केले.यानंतर सायंकाळी 10 वाजता विठ्ठल हरी भजनी मंडळाच्या वतीने भजनाचा,व भारुडाचा कार्यक्रम घेण्यात आला.
दि.7 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता संत सेना महाराज यांच्या प्रतिमेवर गुलालाची उधळण करण्यात आली. त्यानंतर सर्व भाविक भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे संयोजक जगदीश सुरवसे व तसेच या कार्यमाच्या यशस्वीतेसाठी संत सेना नाभिक युवा मंच अचलेर व संतोष सुरवसे,रविंद्र सुरवसे,सवराज सुरवसे,नागनाथ सुरवसे,दिपक सुरवसे,सिद्राम सुरवसे,देविदास क्षिरसागर यांनी परिश्रम घेतले.यावेळी संत सेना महारiजाचे भक्तगण व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.