लोहारा (इकबाल मुल्ला) :-
सह्याद्री परिवारातील शाळा, महाविद्यालय, पतसंस्था व हाँस्पीटल्स या सर्व ठिकाणी पर्यावरण पुरक शाडुचे गणपती ची प्रतिष्ठापना करणार असल्याचे डॉ.दापके-देशमुख दिग्गज यांनी सांगीतले.
ते पुढे म्हणाले कि,गणेशोत्सव सार्वजनिक करण्यामागे समाजप्रबोधन समाजहीताची कामे हा उद्देश होता,परंतु कालांतराने याला वेगळे स्वरूप प्राप्त झाले. पीओपीच्या गणेश मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने नैसर्गिक पाण्याचे स्तोत्र बंद होतात.त्यामुळे शक्यतो शाडुचे गणपती बसवावीत. तसेच सजावटीसाठी प्लास्टिक,थर्माकोल, इ.साहित्य वापरता नैसर्गिक व पारंपरिक साहित्य वापरावीत, असे आवाहन सह्याद्री फाऊंडेशन्स उस्मानाबाद चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. दापके-देशमुख दिग्गज यांनी केले आहे.