मुरुम :
उमरगा तालुक्यातील येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०१८-१९ चा बॉयलर प्रदिपन सोहळा शुक्रवार रोजी कारखान्याचे चेअरमन आ.बसवराज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
या वेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील,व्हाईस चेअरमन सादिकमियाँ काझी,जिल्हा परीषदेचे विरोधी पक्षनेते शरणजी पाटील,उमरगा जनता बँकेचे चेअरमन रामकृष्णपंत खरोसेकर,एस.एस.पाटील,जि.प.सदस्य रफीक तांबोळी,जालिंदर कोकणे, नागण्णा वकील,विकास हराळकर,विजय सोनकटाळे,प्रमोद मुरळीकर,प्रमोदआबा कुलकर्णी,कार्यकारी संचालक एम बी अथणी,दत्ता चटगे,माजी नगराध्यक्ष सुधीर अंबर,उपनगराध्यक्ष संतोष चिलोबा,नगरसेवक श्रीकांत बेंडकाळे,पं स माजी सदस्य उल्हास गुरगुरे आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ.पाटील म्हणाले की,साखर कारखानदारी ही ग्रामीण भागाची संजीवनी आहे.मागील हंगामातील ऊस पुरवठादार शेतकऱ्यांचे ऊसबील वेळेत अदा केलेले आहे.चालू वर्षी गाळपासाठी सक्षम तोडणी,वाहतूक यंत्रणा तयार असून मशनरी ही सज्ज आहे.या वर्षी कारखाना कार्यक्षेत्रात सात लाख मे.टन.ऊस असून पाच लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट आहे.कारखान्याच्या माध्यमातून सभासद,शेतकरी,भागातील तरुण,वाहनमालक व व्यापारी यांची आर्थिक उन्नती व्हावी व परीसराचा विकास व्हावा यासाठी आपण साखर कारखाना उभा केला आहे.कारखान्यावर हजारो कुंटूंबे अवलंबून आहेत.ग्रामीण भागात शेती हा मुख्य व्यवसाय आहे.शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारणे,टिकवणे व वाढवणे गरजेचे आहे.सभासदांनी आपला चांगल्या प्रतीचा परिपक्व ऊस कारखान्याला देऊन आपला व कारखान्याचा हित साधावा असे आवाहन आ.पाटील यांनी केले.यावेळी कारखान्याचे सर्व संचालक,सभासद,शेतकरी,वाहतुक ठेकेदार,मुकादम,विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
