काटी (उमाजी गायकवाड) :-
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील भैरवनाथ दत्तु साळुंके यांच्या राहत्या घरात कैन्सिलकडून कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना गेल्या अनेक वर्षापासून वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे आढळून आल्याने सोमवार रोजी संध्याकाळी आरोपी सोनातन उर्फ सनातन विष्णू दास (रा. बागचेरा ता. गायघाटा जिल्हा नॉर्थ 24 परगनास, पश्चिम बंगाल हल्ली मुक्काम काटी ता. तुळजापूर) यांच्यावर तालुका वैद्यकीय अधिकारी मोहम्मद रफिकोद्दीन मोहम्मद कबीरोद्दीन अन्सारी ( वय 46) यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टर नंबर 91/2018 कलम 419, 420 भादंविसह कलम महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियम 1961 मधील कलम 33,34, 36, 38 नुसार तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पठाण करीत आहे.
दरम्यान, आरोपीस आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास तीन दिवसाची पोलीस कोठडीची सुनावली आहे.
दरम्यान, आरोपीस आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास तीन दिवसाची पोलीस कोठडीची सुनावली आहे.
तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात अशा बोगस डॉक्टरांचे पेव फुटले असून हे बोगस डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. अशा बोगस डॉक्टरांवर कधी कारवाई होणार? असा प्रश्न ग्रामीण भागातून विचारला जात आहे.