तुळजापूर : दास पाटील

मुक्तीसंग्राम लढ्यात तुळजापूर शहर निजामाच्या जोखडातून मुक्त करताना वीरमरण आलेले शहीद सैनिक जमादार हरीराज सिंग आणि जमादार मांगेराम यांच्या समाधीस्थळाचे पूजन करण्यात आले. मराठवाडा सामाजीक संस्थेच्या वतीने यावेळी वीर हुतात्मा सैनिकांच्या समाधीस्थळावर पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष किरण हंगरगेकर, कार्याध्यक्ष संदीप गंगणे, श्रीकांत कदम,अविनाश सराटे, देवेंद्र पवार, जीवनराजे इंगळे, महेंद्र कावरे, अमर वाघमारे, अण्णासाहेब क्षीरसागर, दिलीप भारती, कुमारतात्या टोले, दत्ताजी सोमाजी, महेश चोपदार, प्रशांत भागवत, निरंजन डाके, आरिफ बागवान आदींची उपस्थिती होती.


यावेळी १७ सप्टेंबर हा मराठवाडा सामाजीक संस्थेचा वर्धापन दिन असल्याने तुळजापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने संस्थेला शुभेच्छा देत पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत कदम, दास पाटील, संजय गायकवाड, विष्णू गायकवाड यांची उपस्थिती होती. 

 
Top