तुळजापूर : दास पाटील

शहरातील शुक्रवार पेठ भागातील राजे संभाजी तरुण मंडळाने प्रतिष्ठापीत केलेल्या श्री गणरायाच्या मूर्तीवर हेलिकॉप्टरद्वारे हवाई पुष्पवर्षाव करण्यात येणार आहे.  दि. १८ रोजी सकाळी ११ वा. पासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत श्रींच्या मूर्तीवर अखंड पुष्पवर्षाव करून यंदा प्रथमच असा उपक्रम मंडळ राबवीत आहे. यासाठी औरंगाबाद येथून या उपक्रमासाठी हेलिकॉप्टर मागविण्यात आले आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विशाल छत्रे यांनी ही माहिती दिली. 

शहरातून कोणत्याही प्रकारची देणगी, वर्गणी गोळा न करता सभासदांच्या वर्गणीतून गणेशोत्सवात विविध सामाजीक उपक्रम पार पाडणारे मंडळ म्हणून संभाजी तरुण मंडळाची ओळख आहे. श्रींच्या रोजच्या आरतीसाठी प्रतिष्ठीत मान्यवरांसह समाजातील उपेक्षीत घटकांना आमंत्रीत करून आपले वेगळेपण या मंडळाने राखले आहे.

हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवर्षाव करण्याचा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष सचिन कदम, उदय अमृतराव, अतुल कदम, प्रविण शिंदे, महेश गरड, विशाल निंबाळकर, राम छत्रे, ननू साठे, अमित आरगडे, मोहन मोगरकर, दिगंबर काचोळे आदी परिश्रम घेत आहेत.

 
Top