तुळजापूर : कुमार नाईकवाडी

तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत सोमवार दि. १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

यावेळी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भारत पाटील, उपसरपंच शुभांगी साबळे, उपाध्यक्ष भाग्यश्री म्हेत्रे, ग्राप सदस्य उमेश पांडगळे, केंद्रप्रमुख व केंद्रीय मुख्याध्यापक रामराव खलाटे यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करून रामराव खलाटे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला. यावेळी गावातील अनेक पालक व नागरिक तसेच मान्यवर व सर्व शिक्षक उपस्थित होते. महिला मोठ्यासंख्येने उपस्थित होत्या.

ध्वजारोहण नंतर झेंडा गीत झाले व त्यानंतर गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.अनेक घोषणा देण्यात शाळेतील शिक्षक श्री दीपक घोडके व जगदाळे सर यांनी मराठवाडा मुक्ति संग्राम दिनानाबाबत मुलांना माहिती सांगितले. यावेळी  शाळेतील मुलांना खाऊ चे वाटप करण्यात आले. सर्व कार्यक्रम चे सूत्रसंचालन उमेश सुर्वे यांनी केले तर शेवटी आभार पवन सूर्यवंशी यांनी मानले.

कार्यक्रमास शाळेतील केंद्रप्रमुख तथा केंद्रीय मुख्याध्यापक रामराव खलाटे तसेंच  शिक्षक पवन सूर्यवंशी, दीपक घोडके, जगन्नाथ वाघे, उमेश सुर्वे, छगन जगदाळे, नंदा मोरे, मंदा भड, दीपाली परदेशी, जयश्री चव्हाण, माया पवार, संजीवनी  सरवदे सह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.

बारूळ येथील प्रियदर्शनी जि.प.शाळेत मराठवाडा मुक्ती सग्राम दिन साजरा


तुळजापूर तालुक्यातील बारूळ येथील जिल्हा परिषदेच्या प्रियदर्शनी शाळेत सोमवार दि १७ रोजी सकाळी साडे आठ वाजता मुख्याध्यापक अजित माळी यांच्या हस्ते स्वामी रामानंद तिर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थी श्रेयस माळी याच्या वाढदिवसा निमित विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नागनाथ भालेकर, अमर जडे, जोतिबा गोरे, संतोष सगर, सोमनाथ क्षिरसागर, अतुल माळी आदीसह विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top