तुळजापुर : कुमार नाईकवाडी
मराठवाडा मुक्ती संग्रामातील शुर वीर हुतात्म्यांना येथील न.प. च्या वतीने प्रभारी नगराध्यक्ष चंद्रकांत(बापु) कने यांच्या हस्ते सोमवार दि. १७ सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी ८ वाजता येथील दिपक चौक व छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळील असलेल्या स्वांतञ्य सैनिकांच्या स्मारकांना पुष्प चक्र अर्पन करुन तसेच महापुरुषाच्या पुतळ्याना पुष्पहार अर्पन करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.
त्याच बरोबर येथील न.प.मध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औच्युत प्रभारी नगराध्यक्ष चद्रंकांत (बापु)कने यांच्या हस्ते धव्जारोहन करण्यात आले. या वेळी न.प. मुख्याधिकारी आशिष लोकरे, नगर परिषद चे नगरसेवक सचिन रोचकरी, विजय कंदले,किशोर साठे ,औदुबंर कदम आदीसह न.प.कर्मचारी उपस्थिती होते.
त्याचबरोबर येथील तहसील कार्यालयात तहसीलदार दिनेश झांपले यांच्या हस्तेध ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तालुक्याचे आमदार मधुकरराव चव्हाण, रा.काँ.चे प्रदेश चिटणीस गोकुळ शिंदे, प.स.सभापती शिवाजीराव गायकवाड. आमदार चव्हाण यांचे स्विय सहाय्यक बबन जाधव, काँग्रेसचे शहर अध्यक्ष भारत कदम, खंडु जाधव आदीसह शहरातील नागरीक उपस्थित होते. तसेच शहरात मुक्ती संग्राम दिनी विविध उपक्रम राबवुन शहरात विविध कार्यालयात धव्जा रोहण करुन मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
