रोहिदास पवार 
पुणे (वसंत जाधव) :- 

मुंबई येथील अंधेरी पुर्व च्या सिप्झ कंपनी जवळील बंजारा समाजाची वस्ती व बंजारा समाजाचे अरध्य दैवत संत सेवालाल महाराजांचे मंदिर मेट्रो रेल्वेचे बांधकामासाठी उध्वस्त करण्यात आले. महाराष्ट्र नव्हे तर देशात बंजारा समाज अनुसुचीत जमाती (ST) आरक्षणाचे मोर्चा, आंदोलन करीत आहेत. हा मुद्दा मागे राहावे यासाठी  आघाडी सरकारने काही मुद्दे काढुन समाज याचं प्रकरणात  अडकावे यासाठी हा अंधेरी पुर्व संत सेवालाल महाराज यांचे मंदिर तोडल्याचे राष्ट्रीय बंजारा मिशनचे माजी प्रदेशाध्यक्ष रोहिदास पवार यांनी सांगितले.

रोहिदास पवार यानी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, काही दिवसापुर्वी हिंगोली जिल्हात संत सेवालाल महाराज यांच्या  मंदिराची तोड फोड केली होती. या प्रकरणी बंजारा समुदायाने रास्ता रोको आंदोलन केला होता. मात्र जिल्ह्यातील जिल्हा अधिकारी कार्यलयातून यासाठी पर्याय व्यवस्थ उपलब्ध करुन देण्याचे सांगण्यात आले होते. बंजारा समाजातील कुठल्याही व्यक्तीला नोटीस न देता मंदिर तोडण्यात आला आहे. बंजारा समाजातील लोकांचे घरे तोडण्यात आले. राज्य सरकारचा गोर गरिबांना घरे देण्याचा सोडून घर तोडण्याचा काम हा राज्य सरकार करत आहे. यासाठी पर्याय म्हणून  दुसरी कडे पर्याय व्यावस्था करण्यात यावी अन्याय महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा रोहिदास पवार यांनी दिला आहे. 
 
Top