उस्मानाबाद :- शहरास सुरू असलेल्या उजनी धरणातील  पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून वाढत असल्याने त्या संदर्भात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शहरास पाणी पुरवठा होत असलेल्या तेरणा जलशुद्धीकरण केंद्रास भेट दिली. यावेळी आ. पाटील यांनी संबंधित पाणी पुरवठा अधिकारी व कर्मचाऱ्यांना शहरास होत असलेली पाणी टंचाईसंदर्भातील तक्रारी दूर करून पाणी पुरवठा सुरळीतपणे करण्याच्या सूचना केल्या.

यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्यासमवेत  नगरसेवक खलिफा कुरेशी, बाबा मुजावर, गणेश खोचरे,इस्माईल शेख राजसिंहा राजेंनीबाळकर, निलेश पाटील आदीजण उपस्थित होते.
 
Top