नळदुर्ग :
येथील तुळजा भवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना चालवण्यास मी स्वतः इच्छुक असून दृष्टी शुगरच्या माध्यमातून आपल्या परिसरातील शेतकऱ्यांची सेवा करता येईल या उद्देशानेच मी हा कारखाना चालवण्यास घेण्यासाठी इच्छुक आहे, मात्र तालुक्यातील राजकीय धुरीणांनी कारखाना मी चालण्यास घेतल्यानंतर त्यांना राजकीय अडचण होणार आहे.म्हणून हेतुपुरस्पर मला या निविदा प्रक्रियेतून दूर लोटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आशोक जगदाळे यानी शनिवार रोजी आयोजित पञकार परिषदेत केला.
पुढे बोलताना जगदाळे म्हणाले की, तुळजाभवानी कारखान्याबाबत राबविण्यात येत असलेल्या निविदा प्रक्रिया मध्ये पारदर्शकता नसल्यामुळेच ही प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी मी सहकार मंञ्यांना विनंती वजा अर्ज केला होता. हा कारखाना चालू व्हावा व कारखाना चालण्यास घेणाऱ्यास भविष्यात कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये हाच माझा हेतू होता असे प्रतिपादन दृष्टी शुगरचे प्रवर्तक अशोक जगदाळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले. जगदाळे यांनी सहकार मंञ्याकडे निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्याची विनंती केली होती. व या अनुशंगाने दि.२१ रोजी सहकार मंञ्यांनी तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्याच्या निविदा न उघडता स्थगिती दिली आहे.
सदर कारखान्यावर जिल्हा बँक तसेच इतर शासकीय देणे शासकीय निमशासकीय कामगाराचे देणे या विषयाचा कोणताही तपशील ठळकपणे नमूद करण्यात आलेला नाही. सदर कारखान्याची शासकीय निमशासकीय थकबाकी विषयी तसेच न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणाची कुठलाही तपशील हे जाणीवपूर्वक नमूद केलेला नाही. बँकेसोबत करारनामाचा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आलेला नाही, प्रथम गळीत हंगाम 2018 - 19 दर्शवण्यात आलेला आहे परंतु ही प्रक्रिया, इतर सोपस्कर पुर्ण करण्यासाठी लागणारा वेळ पाहता व तसेच गेल्या सहा वर्षांपासून बंद असलेल्या जुन्या मशनरी सुसज्ज करणे या सर्व वस्तुस्थिती पाहता 2018- 19 गळीत हंगाम घेणे अशक्य असल्याचे दिसून येते. संचालक मंडळाकडे बऱ्याच गोष्टीचा निर्णय राखून ठेवले आहेत वरील सर्व बाबींचा विचार करता सदर निविदा प्रक्रिया मध्ये कुठेही पारदर्शकता असल्याचे निदर्शनास येत नाही ,म्हणून स्थगिती देऊन नव्याने निविदा प्रक्रिया घेण्यात याव्यात अशी विनंती दृष्टी शुगरच्या वतीने आर्जाद्वारे करण्यात आली होती, असे जगदाळे यांनी यावेळी सांगितले.