नळदुर्ग :
धनगर समाजाच्या एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना घडल्याप्रकरणी दोषी सर्व आरोपींविरुध्द कठोर कारवाई करावी, अन्यथा धनगर समाजाच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा नळदुर्ग येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी जन्मोत्सव समितीच्यावतीने नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांना बुधवार दि. 26 सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, येणेगूर ता. उमरगा येथील धनगर समाजाच्या अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली असून या घटनेतील आरोपीवर कडक कारवाई करुन पिडीत मुलीला न्याय दयावा, तसेच या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपीपैकी फक्त एकाच आरोपीवर कारवाई केली आहे. इतर तीन आरोपीवरही कारवाई करण्यात यावी, या प्रकरणाचा तपास सक्षम यंत्रणेकडे देण्यात यावा, योग्य ती कारवाई न झाल्यास धनगर समाजाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवदेनावर दयानंद चौरे, पदमाकर घोडके, ज्ञानेश्वर घोडके, सुहास येडगे, विलास येडगे, रमेश घोडके, दिपक घोडके, अमर भाळे, तानाजी जाधव, मारुती घोडके, प्रभाकर घोडके, अमित शेंडगे, प्रविण चव्हाण, लखन भोसले आदींच्या स्वाक्ष-या आहेत.
