तुळजापूर : कुमार नाईकवाडी

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात गुरूवार दिनांक २७ रोजी द्वितीय वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यासाठी टीपीओ अंतर्गत करिअर गाईडन्स यावर सेमिनार घेण्यात आले. 

प्रारंभी  मान्यवरांचे स्वागत  प्राचार्य  डॉ. शेखर जगदे  व प्रा . रवी मुदकण्णा यांनी केले. या शिबिरात युनिक अकॅडमी उस्मानाबादचे प्राध्यापक धनेश वरुळे व सुमंत वेदलंकार यांनी यूपीएससी व एमपीएससी या स्पर्धा परीक्षेसाठी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच टीपीओ प्रमुख प्राध्यापिका छाया घाडगे यांनी या विषयी मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरयू क्षिरसागर व अंजली कदम या विद्यार्थिनीने केले आभार पूजा लाड हिने मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी  समन्वयक प्रा. संतोष एकदंते ,प्रा. एन.आर .चव्हाण, प्रा.धुरगु्डे व प्रा. प्रिया पवार यांनी परिश्रम घेतले.
 
Top