तुळजापूर : कुमार नाईकवाडी
तालुक्यातील काक्रंबा येथील जिल्हा परिषद शाळेत आज शुक्रवार दि २९ रोजी काक्रंबा व किलज केंद्रातील शिक्षकाचे तीन दिवशीय बीट स्तरीय मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यशाळा सुरुवात झाली. तीन दिवस चालणाऱ्या बीट स्तरीय मूल वर्धन प्रशिक्षण कार्यशाळे मध्ये काक्रंबा व किलज या २ केंद्रातील ३५ शिक्षक व ४ साधनव्यक्ती यांनी सहभाग घेतला आहे. याच प्रशिक्षण कार्यशाळेचे अनिल बंडगर , शालेय व्यस्थापन समिती अध्यक्ष भारत पाटील , केंद्रप्रमुख रामराव खलाटे,यांच्या प्रमुख उपस्थितीत सरस्वती च्या प्रतिमेच पूजन करून सुरूवात करण्यात आली.
यावेळी पत्रकार ज्ञानेश्वर वाघमारे व शिक्षक पवन सुर्यवंशी यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यशाळेस सुरुवात झाली. आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रशिक्षण च नेमका उद्देश केंद्रप्रमुख खलाटे यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये सांगितला. व तालुक्यावरून आलेले साधनव्यक्ती श्री जाधव यांनी प्रशिक्षण ची रूपरेषा मंडळी व त्यानंतर मान्यवरांचे मनोगते झाली व त्यांनी प्रशिक्षण ला शुभेच्छा देण्यात आल्या.तत्पूर्वी प्रशचे उद्दिष्ट पवन सुर्यवंशी यांनी सांगितले. कार्यक्रम चे सूत्रसंचालन साधनव्यक्ती श् मसलेकर यांनी तर आभार उमेश सुर्वे यांनी मानले. कार्यक्रम स साधनव्यक्ती मसलेकर, मोरे , बाबू चेपटे, जाधव , तसेच बिट मधील 33 शिक्षक उपस्थित होते. सदर प्रशिक्षण हे पहिला टप्पा 3 दिवस चालणार असून दुसरा टप्पा हा दि 5 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे.
