उस्मानाबाद, दि.15 :  

भारतरत्न तथा माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उदघाटन मा.श्री.किरण घोटकर,सहायक संचालक निधी व लेखाकार्यालय यांच्या हस्ते डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री.अनिल सुर्यवंशी,श्री सचिन इगे,जिल्हा कोषागार अधिकारी, श्री.आप्पसो पवार,लेखाधिकारी, एम.एस.आर.एल.एम,श्री. प्रताप भंडारे,लेखाधिकारी,जिल्हाअधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, श्री. अतुल जगताप समाजकल्याण निरीक्षक,समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद,श्री.बप्पा नाईकनवरे,अधिक्षक समाजकल्याण,मुलांचे शासकीय वस्तीगृह श्री.सुधीर आचार्य निरीक्षक श्री.रोहन जाधव,श्री.दत्तात्रय जावळे,श्री.शाहुराज भोरे आदिसह वाचक वर्ग उपस्थित होता.
                                                                       
 
Top