तुळजापूर (कुमार नाईकवाडी) :- 

आगामी श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवाची पूर्वतयारी म्हणून मंदीर संस्थानची प्रशासकीय बैठक मंगळवार दि. 11 सप्टेंबर रोजी संपन्न झाली. मंदीर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या या बैठकीत मागील बैठकीतील विविध विषयांवरील कामांचा आढावा घेण्यात आला. 

पुर्वी प्रमाणे दर्शनासाठी घाटशीळ मार्गे भाविकांना दर्शनासाठी व्यवस्था केलेली आहे. यासाठी पाळकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे परमेश्वर, उपाध्य पुजारी मंडळाचे अध्यक्ष आनंद कोंडो यांनी मान्य केले आहे. शहराबाहेर पार्कींग दोन-तीन कि मी अंतरावर केल्यामुळे भाविकांचे मोठे हेळसांड होत आहे. यासाठी शहरात पार्कींगची व्यवस्था करावी, अशी पुजारी मंडळाची मागणी होती. मातंगी देवी मंदिराजवळील अतिक्रमण काढून त्या दोन साईडनी स्टील चे ग्रील आठ दिवसाच्या आत बसावे जेणेकरुन भाविकांची गैरसोय होणार नाही. तसेच शहरात व बाहेरील एल .एङी . लाईट बसवण्यात यावी, असा आदेश संबधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. 

तसेच शहरातील पुजारी वर्गाना पुर्वीप्रमाणे जिजाऊ महाद्वारातून प्रवेश दिला जाईल यासाठी तिन्हीही पुजारी मंडळाने त्याच्या याद्या द्यावा त्यांना ओळखपत्र देण्यात येईल आणि चरण तीर्थ, प्रक्षाळ त्यांना सुध्दा पास दिले जातील. सुरक्षेच्या दृष्टीकोणातून कोणती घटना कधी घडले सांगता येत नाही यासाठी अतिदक्षता म्हणून शहाजीराजे महाद्वार, जिजाऊ महाद्वार खुले सोडले आहेत. 

प्रत्येक वर्षी प्रमाणे १५ आरोग्य प्रथमोपचार केंद्र होती, त्यात आराधवाडी येथे एक प्रथमोआचार केंद्र वाढवण्यात आले आहे. औषध गोळ्यासाठी पुरवण्याचे नगर परिषद तुळजापूर यांना आदेश देण्यात आले आहेत. शासकीय रुग्णालय येथे आपत्तकालीन दोन वार्ड राखीव ठेण्यात येणार तर मंदिरामध्ये आरोग्य प्रथमउपचार केंद्र २४ तास चालु ठेवण्यात येणार आणि प्रत्येक पार्किंग ठिकाणी १०८ रूग्नवाहिका तसेच  १०८ रूग्नवाहिका उपजिल्हा रुग्लालयात काय स्वरूपी आली आहे. त्याचबरोबर शहाजीराजे महाद्वार जवळ १०८ रूग्नवाहिका २४ तास उपलब्ध राहिल, असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

या बैठकीत प्रामुख्याने नगरपरिषद आणि मंदीर समिती यांच्या नवरात्र महोत्सवातील कामाबाबत चर्चा झाली. यावेळी मुख्याधिकारी आशिष लोकरे यांनी नवरात्र महोत्सवातील कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, ती अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. तसेच शहर सुरक्षा संदर्भात पोलीस प्रशासनाच्या मदतीने नकाशा रेखनाचे काम सुरु असून ते लवकर पूर्ण करून त्याप्रमाणे शहरात बॅरिकेटींग करण्यात येईल असे सांगितले. तसेच शहरातील अतिक्रमण हटवावे तसेच शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात यावे, कर्नाटक येथील बसस्थानक पुर्वी ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी राहील.

पाणीपुरवठ्यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याशी चर्चा करून पाणी पुरवठा व भुयारी गटार या बाबत निर्णय घेण्यात येईल. यावेळी जिल्हाधिकारी गमे यांनी नगरपरिषदेने संबंधीत यंत्रणेशी संपर्क साधून कामे पूर्ण करावीत अशा सूचना केल्या. तसेच यापुढे दि. ३० सप्टेंबर पर्यत नवरात्र महोत्सव सर्व कामे पुर्ण झाली पाहिजेत असे आदेश जिल्हाधिकारी गमे यांनी दिले. नवरात्र महोत्सवाची दि. ३० सप्टेंबरच्या आत एक आढावा बैठक हाईल.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता खलिपे यांनी रस्त्यांच्या कामाबाबत माहिती देऊन ही कामे लवकर पूर्ण करण्यात येतील, असे सांगितले. सर्व कामे दि. ३० सप्टेंबर पर्यंतच्या आत पुर्ण झाली पाहिजे असे संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले .

या बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक आर. राजा, पोलिस उपअधिक्षक संदीप घुगे, निवासी जिल्हाधिकारी खांदारे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसीलदार दिनेश झांपले, मंदीर व्यवस्थापक तथा तहसीलदार राहुल पाटील, धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी, मंदीर समितीचे अभियंता भोसले, नगर परिषद मुख्याधिकारी आशिष लोकरे, उपजिल्हा वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ .एच . व्हि . होनमाणे, पोलिस निरिक्षक राजेंद्र बोकडे, पोलिस निरिक्षक संजय बाबर , पुजारी सुधिर ( बापू ) रोचकरी, सुधिर कदम , सज्जन साळुंके, अरविंद अपासिंगकर, हेमंत कांबळे, नागेश साळुंके यांच्यासह  कर्मचारी उपस्थित होते.

 
Top