नळदुर्ग :
नगर परिषद नळदुर्ग यांच्या वतीने बुधवार दि.१९ रोजी हुतात्मा स्मारक येथे दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत शहरातील २४ महिला बचत गटांना फिरता निधी वाटप करण्यात आला. तसेच स्वच्छ सर्वेक्षण २०१९ च्या अनुषंगाने 'स्वछता ही सेवा' या मोहिमेअंतर्गत महिला बचत गटांना घरोघरी ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण करणे बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमास नगराध्यक्षा रेखा जगदाळे, उपनगराध्यक्षा शाहीन मासुलदार, मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड, महिला महामंडळाच्या समन्वयक शोभा कुलकर्णी, आदीजन व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी शहरातील बचत गट सदस्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुनिर शेख तर आभार राणूबाई सपकाळ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुरज गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पालिका कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
