तुळजापुर : कुमार नाईकवाडी

तालुक्यातील मंगरुळ येथे ग्रामपंचायत व तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय यांच्या वतीने अंगणवाडी पोषण आहार महीना शुभारंभ व गरोदर माता, स्तनदा माता तसेच किशोरवयीन मुलींना समोपदेशन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी डॉ. कोलते यांच्या हस्ते अर्धवार्षिक वाढदिवस साजरा करण्यात आ.ला त्या 6 महिन्याच्या बालकाला केळी व भात खाऊ घालण्यात आला, तसेच गरोदर मातांचे ओटीभरण व लोकसहभागतुन बालकांना अंडी वाटप करण्यात आले. याच उपक्रमात विशेष ग्रामसभा, गोपालपंगत, बेटी जन्मोत्सव, कुपोषण प्रमाण कमी करणे, कमी वजनांचे  बालकांची आरोग्य तपासणी, पोषण आहार जनजागृती असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे डॉ. कोलते यांनी सांगितले. 

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.एच. निपाणीकर, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीकांत हावले, सहा. गटविकास अधिकारी एम. एच. राउत, ग्रामसेवक लक्ष्मण सुरवसे, सरपंच सत्तार मुलाणी, उपसरपंच प्रतापसिंह सरडे, किसन डोंगरे, सुनील जाधव, नशीब शेख, तानाजी सरडे, राजकुमार कोरेकर, मेहराज शेख, अंगणवाडी सेविका उर्मिला कोरेकर, रुकुंबी मुलाणी आदीजण उपस्थित होते. 
 
Top