तुळजापुर : कुमार नाईकवाडी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेस कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथील देवी भक्त श्री एच शामराव यांनी नुकतेच श्री तुळजा भवानी मातेच्या दरबारात होणाऱ्या अभिषेक मंडपासाठी मोठ्या भक्ती भावाने, श्री कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेवर अपार श्रद्धा असल्याने अभिषेक मंडपासाठी ५१ हजार रुपयाची देणगी मंदीर संस्थानकडे सुपुर्त केली. 

श्री देवी भक्त एच शामराव यांनी या पुर्वी सुद्धा १ लाख रुपयाची देणगी दिली आहे. श्री तुळजाभवानी मातेच्या मंदीर परिसरात श्री देवी भक्तांना मुलभुत, सुविधा मंदीर संस्थानने उपलब्ध कराव्यात आणि अभिषेक मंडप सर्व सोयी युक्त हा लवकरात लवकर श्री देवी भक्ताना उभारण्यात यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
गुलबर्गा येथील देवी भक्त आपल्या परिवारा सोबत येवुन श्री कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेच्या दरबारात येवुन श्री देवी ची कुलधर्म कुलाचार पुजा करुन मनोभावे दर्शन घेतले. या वेळी त्यांचे पारंपारिक पुजारी नागेश कालीदास सांळुके यांनी त्यांची यथा सांग पुजा करुन भरभरून आशीर्वाद दिला. दर्शन झाल्यानंतर मंदीर संस्थान च्या धार्मिक कार्यालयात मंदीर संस्थानच्या वतीने तिरुपती वाघे यांनी त्यांचा सत्कार केला.

 
Top