नळदुर्ग  :

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील महाराणा प्रताप गणेश मंडळाच्यावतीने दि. 18 ते 19 सप्टेंबर दरम्यान विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी स्पर्धकांना स्पर्धेत सहभागी होवून लाभ घेण्याचे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. 

मंडळाच्यावतीने माऊली नगर येथील महाराणा प्रताप चौकात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यावर्षी अजयसिंह चंदेले यांनी श्री ची मुर्ती दिली आहे. मंगळवार दि. 18 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता दोरी उडी, तळयात-मळयात, संगीत खुर्ची, बकेट बॉल, त्यानंतर सायंकाळी चार वाजता रांगोळी स्पर्धा, सायंकाळी सहा वाजता थोर महापुरुष या विषयावर वक्तृत्व स्पर्धा, सात वाजता लहान गट मुला-मुलींसाठी फॅन्सी ड्रेस व डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर रात्री नऊ वाजता मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
बुधवार दि. 19 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता मुकबधीर शाळेतील विदयार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, नगरसेवक विनायक अहंकारी, बसवराज धरणे, नितीन कासार, माजी नगरसेवक कमलाकर चव्हाण, भाजपाचे शहराध्यक्ष पदमाकर घोडके यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना कप व शैक्षणिक साहित्य देण्यात येणार आहे. 

कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष इंद्रजितसिंह ठाकूर, उपाध्यक्ष महेशसिंह हजारी, अभिजितसिंह चंदेले, कोषाध्यक्ष पवन चंदेले, रोहन माने, सचिव सुरजसिंह ठाकूर, सहकोषाध्यक्ष अनिकेतसिंह बिसेनी, रोहित मुळे, शुभम हजारे, प्रसिध्दी प्रमुख सौरभ गहेरवार, सहसचिव अभयसिंह हजारी, सल्लागार सुजिसिंह हजारी, खजिनदार मंगेशसिंह चंदेले, सागरसिंह हजारी, मिरवणूकप्रमुख राहुलसिंह हजारी, बलदेवसिंह ठाकूर, दिनेशसिंह हजारी, पृथ्वीराजसिंह ठाकूर, अरुण नाईक, प्रतापसिंह हजारी  यांच्यासह कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत.
 
Top