शहरात येणाऱ्या भाविकांना, पर्यटकांना व नागरीकांना मुलभूत सुविधा तात्काळ पुरविण्यात याव्यात. तसेच शहरात बंद असलेले पथदिवे तात्काळ सुरु करण्याची मागणी राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस संघटनेच्या वतीने शुक्रवार दि. ७ रोजी मुख्याधिकारी, नगर परिषद, तुळजापूर यांना निवेदनद्वारे करण्यात आली आहे.
तुळजापूर शहर हे महाराष्ट्राबरोबर इतर राज्यात श्री.तुळजाभवानी मातेच्या मंदीरामुळे प्रसिध्द आहे. या शहरात महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातील भाविक मातेच्या दर्शनासाठी दररोज लाखोंच्या संख्येने येतात. नगर परिषदेच्या गैरकारभामुळे शहरातील अनेक भागातील पथदिवे बंद आहेत. श्री.तुळजाभवानी मातेच्या मंदीराकडे जाण्यासाठी विविध मार्ग असल्याने, रात्रीच्या वेळी परगांवाहुन आलेल्या भाविकांची तसेच शहरवासियांची मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे. तसेच नगर परिषदेमार्फत भाविकांना कोणत्याही प्रकारे मुलभूत सुविधा पुरविल्या जात नाहीत.
तुळजापूर शहरात येणाऱ्या भाविकांना, पर्यटकांना व नागरीकांना मुलभूत सुविधा तात्काळ पुरविण्यात याव्यात. तसेच शहरात बंद असलेले पथदिवे तात्काळ सुरु करावे, अन्यथा राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने विविध प्रकारे तिवृ अंदोलन करण्याचा ईशारा निवेदनाव्दारे देण्यांत आला. निवेदनाच्या प्रति नगर विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई, जिल्हाधिकारी, उस्मानाबाद, तहसिलदार, तहसिल कार्यालय, तुळजापूर यांना देण्यांत आल्या.
- यावेळी राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस संघटनेचे जिल्हाध्यक्ष करण साळुंके, शुभम पाटील, विशाल वाघमारे, गणेश मोरे, सुशिल जाधव, सारंग साळुंके, शुभम गाजरे, कल्याण कोरे, सुशिल जाधव, अतिश कोरेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.