उस्मानाबाद : तालुक्यातील गडदेवधरी ते येडशी मार्गावरील कुमाळवाडीपाटी येथील प्रसिध्द खानका-ए-हजरतशेख अल्लाउद्दीन शाह कादरी उर्फ हजरत बाबा मलीक रेहान यांच्या खानका येथे मोहरमनिमित्त गुरुवार दि. 20 सप्टेंबर रोजीपासून  भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे़

यानिमित्त गुरूवारी (दि़२०) सायंकाळी ४ वा़जता पंजाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे़. शुक्रवारी (दि़२१) रात्री ८ वाजता भव्य कव्वालीचा कार्यक्रम रंगणार आहे़ तर शनिवारी (दि़२२) फात्याखानी दुपारी २ वाजता होणार आहे़ तरी या कार्यक्रमाचा हिंदू-मुस्लीम बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन हजरत शेख अल्लाद्दीन शाह कादरी उर्फ हजरत मलिक रेहान मिरासाहेब बहुद्देशीय सोशल वेलफेअर असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. 

 
Top