अक्कलकोट : रियाज सय्यद

इस्लाम धर्मातील नवीन वर्षाची सुरुवात मोहरम या माहिन्यानी होते चंद्राचे दर्शन झाल्यावर मोहरमची १ली तारीखला सुरुवात होते. मोहरमची ५ तारखेला पंजे बसाविण्यात येतात. लाकडी कमानीत इमाम हसन,इमाम हुसेन,इमाम कासिम हे तीन पंजे बसविण्यात येतात. हे पंजे वल्लीभाई बागवान,मकबुल बागवान,व इस्माइल मकानदार धरतात. इस्माइल जमादार व हैदर नदाफ यांनी डोली बयवितात।व दोन्ही डोल्यांच्या मध्ये कमानीमध्ये इमामकासिम हे पंजे बसवितात. त्या पंज्यांना हुसेनी बागवान धरतात. मोहरमचा ९वी तारखेला बडी कत्ल साजरा करतात व मोहरमचा १० तारखेला यानी यौमे आशुराच्या दिवशी शरबत वाटप करतात. गावातील सर्व भाविक देवाला नवैद्य दाखवतात आणि शेवटी मगरीब ची नमाज पठण झाल्यावर विसर्जन साठी पंज्यांना मस्जिदीपासून चावडी व वेशीतून इंदीरा नगर येथे विसर्जन केले जाते. अशाप्रकारे वागदरी गावात मोहरम साजरा केला जातो.
 
Top