मुरुम :

उमरगा तालुक्यातील मुरुम येथे शिवप्रेमी प्रतिष्‍ठान व नवशक्ती गणेश मंडळाच्यावतीने बुधवार दि. 19 सप्टेंबर रोजी मोफत भव्य नेत्र तपासणी व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.  या शिबिरात 31 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर 123 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी आठ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. 

मुरुम येथील सुभाष चौक येथे बुधवार रोजी शिबीर संपन्न झाले. प्रारंभी श्री गणरायाची मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव सानप, सेनेचे सर्कल प्रमुख चंद्रशेखर मुदकण्णा, डॉ नितीन डागा, मराठा सेवा संघाचे संजय सावंत, विठ्ठल पाटील, आडत व्यापारी अमृत वरनाळे, मंडळाचे आधारस्तंभ नगर सेवक अजित चौधरी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 


रक्तदान शिबिरात उमरगा येथील डॉ. पतंगे रक्तपेढी यांनी रक्त संकलन केले. तर नेत्र तपासणी शिबिरात उस्मानाबाद येथील अजमेरा रोटरी रुग्णालय यांनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी मुरुम येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या विदयार्थ्यांचे मोफत रक्तगट तपासणी करण्यात आले. 

शिबीराच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष सागर बिराजदार, विश्वास मोहिते, प्रमोद आळंगे, विशाल टेकाळे, ओमकार चौधरी, जयसिंग खंडागळे, विशाल चौधरी, भुषण मडोळी, महेश हिंडोळे, आण्णा चौधरी, सागर खंडागळे, राजेंद्र चौधरी, रवि देसाटे, शरण मडोळी, पंकज बिराजदार, प्रशांत चौधरी आदींनी पुढाकार घेतला.
 
Top