तुळजापूर : कुमार नाईकवाडी

साडे तीन शक्ती पिठा पैकी पुर्ण पिठ म्हणून ओळखले जाणारी आई श्री तुळजाभवानी मातेच्या श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक म्हणून दि. १८ सप्टेंबर रोजी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या आदेशावरून सिध्देश्वर इंन्तुले यांनी पदभार स्विकारला.

अनेक वर्षापासून  दिलीप नाईकवाडी सहायक धार्मिक व्यवस्थापक पदभार सांभाळत होते. नाईकवाडी यांना  दांडगा अनुभव असल्यामुळे संपुर्ण श्री देवीच्या विधीवत पुजा, कुल, धर्म कुलाचार  विषयी अनेक धार्मिक पुजा मंदिर मधील पुजारी, कर्मचारी, सुरक्षा रक्षक, मंदीरातील नेमावली पुरेपूर दिलिप नाईकवाडी यांना माहिती असल्यामुळे आगामी शारदीय नवरात्र महोत्सवात दिलीप नाईकवाडी व नुतन सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक इंतुले सिध्देश्वर हे नाईकवाडी सोबत राहुन मंदीरातील सर्व माहिती घेणार आहेत. 

 
Top